Followers

Followers

Sunday 30 October 2022

निफ्टी अंदाज दि. ३१/१०/२०२२ ते दि. ०४/११/२०२२

 

  गेल्या लेखात म्हणजेच दि. १७/१०/२०२२ च्या लेखाप्रमाणे ज्या गोष्टींचा अंदाज बांधला होता त्याला १००% यश मिळालं . मागच्या आठवड्यात लेख लिहायची गरज भासली नाही कारण दिवाळी पर्यंतचे टार्गेट आधीच बांधले होते ते दिवाळीत पूर्ण झाले गेल्या आठवड्यात trading  साठी दिवस पण कमी होते त्याच प्रमाणे जवळपास २ वर्षांनी दिवाळी मुक्तपणे साजरी होत होती त्यामुळे सगळीच माणसं  त्या धामधुमीत होती trader  आणि मार्केट मेकर्स तरी त्याला कसे अपवाद असणार असो, येत्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया . 


१: निफ्टी चार्ट daily  candle  चा ठेवावा . 


२: गेले काही दिवस निफ्टी high  volatile  चाल दाखवताना दिसून येत आहे . 


३: मूळ ट्रेण्ड  हा uptrend  आहे . त्यात शंका नाही daily  candle  बघता शांतता जरी वाटत असली तरी intraday  trading  करताना जी movement  बाजारात सध्या चालू आहे ती हाताळणे म्हणजे तारेवरची कसरत आणि मेंदू ला खाद्य तसेच विचारांची परीक्षा असंच  म्हणावं लागेल . 


४: zig  zag  स्वरूपाची चाल सध्या निफ्टी दाखवत आहे . 


५: १७७८६ पाशी सध्याचे closing  दिसून येत आहे आणि त्यापाशी लगेच कोणता resistance  दिसून येत नाही . १८००० ते १८१०० दरम्यान एक level  आहे म्हणजे आजून ३०० ते ३५० पॉईंट ची movement  मिळू शकेल . 


६: तिथून मात्र एक correction  अपेक्षित आहे . ते साधारण १७४५० ते १७७०० दरम्यान दिसून येत आहे आणि या level  पासून जो bounce  बघायला मिळेल तो nifty  ला १८४०० पर्यंत घेऊन जाईल यात शंका नाही तर खात्री वाटते . 


७: पण या झाल्या फार पुढच्या गोष्टी हे सर्व ठोकताळ्याप्रमाणे होण्यास साधारण २० ते २५ दिवस लागतील पण आपला view  आज दि. ३१/१०/२०२२ ला तयार आहे आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे . 


८: येत्या आठवड्यापुरता विचार केला तर तेजीचाच विचार आहे . निफ्टी मध्ये बोलायचं झाल्यास फार Gapup  झालं तर सावध काम करावं लागेल . 


९: आठवड्याची सुरवात जरी तेजीने झाली तरी शेवट मात्र मंदीने होईल असा प्राथमिक अंदाज आहे . 


१०: option  बद्दल बोलायचं झालं तर Dec  ending  चा १७७००  आणि १८००० चा CE  कॉल option  निशाण्यावर हवा आपल्या टप्प्यात आला तरच entry  रुपी बंदुकीचा चाप  ओढणं गरजेचं . 


११:बाकी stock  जसे ओपन होतील तसे status ,  Facebook  आणि  telegram  वर टाकतो आहेच .


Technical Hunting

लेखक: श्री. शंतनु पोतनीस

कोल्हापूर


स्टॉक मार्केट च्या update तुमच्या WhatsApp  वर हवे असतील तर सोबतचा  फॉर्म भरावा 


form link 👉 https://forms.gle/9dz8dgTe7WB6RGqq7


Telegram  link : https://t.me/technicalhuntingstockmarket

No comments:

Post a Comment