गेल्या लेखात म्हणजेच दि. १७/१०/२०२२ च्या लेखाप्रमाणे ज्या गोष्टींचा अंदाज बांधला होता त्याला १००% यश मिळालं . मागच्या आठवड्यात लेख लिहायची गरज भासली नाही कारण दिवाळी पर्यंतचे टार्गेट आधीच बांधले होते ते दिवाळीत पूर्ण झाले गेल्या आठवड्यात trading साठी दिवस पण कमी होते त्याच प्रमाणे जवळपास २ वर्षांनी दिवाळी मुक्तपणे साजरी होत होती त्यामुळे सगळीच माणसं त्या धामधुमीत होती trader आणि मार्केट मेकर्स तरी त्याला कसे अपवाद असणार असो, येत्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया .
१: निफ्टी चार्ट daily candle चा ठेवावा .
२: गेले काही दिवस निफ्टी high volatile चाल दाखवताना दिसून येत आहे .
३: मूळ ट्रेण्ड हा uptrend आहे . त्यात शंका नाही daily candle बघता शांतता जरी वाटत असली तरी intraday trading करताना जी movement बाजारात सध्या चालू आहे ती हाताळणे म्हणजे तारेवरची कसरत आणि मेंदू ला खाद्य तसेच विचारांची परीक्षा असंच म्हणावं लागेल .
४: zig zag स्वरूपाची चाल सध्या निफ्टी दाखवत आहे .
५: १७७८६ पाशी सध्याचे closing दिसून येत आहे आणि त्यापाशी लगेच कोणता resistance दिसून येत नाही . १८००० ते १८१०० दरम्यान एक level आहे म्हणजे आजून ३०० ते ३५० पॉईंट ची movement मिळू शकेल .
६: तिथून मात्र एक correction अपेक्षित आहे . ते साधारण १७४५० ते १७७०० दरम्यान दिसून येत आहे आणि या level पासून जो bounce बघायला मिळेल तो nifty ला १८४०० पर्यंत घेऊन जाईल यात शंका नाही तर खात्री वाटते .
७: पण या झाल्या फार पुढच्या गोष्टी हे सर्व ठोकताळ्याप्रमाणे होण्यास साधारण २० ते २५ दिवस लागतील पण आपला view आज दि. ३१/१०/२०२२ ला तयार आहे आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे .
८: येत्या आठवड्यापुरता विचार केला तर तेजीचाच विचार आहे . निफ्टी मध्ये बोलायचं झाल्यास फार Gapup झालं तर सावध काम करावं लागेल .
९: आठवड्याची सुरवात जरी तेजीने झाली तरी शेवट मात्र मंदीने होईल असा प्राथमिक अंदाज आहे .
१०: option बद्दल बोलायचं झालं तर Dec ending चा १७७०० आणि १८००० चा CE कॉल option निशाण्यावर हवा आपल्या टप्प्यात आला तरच entry रुपी बंदुकीचा चाप ओढणं गरजेचं .
११:बाकी stock जसे ओपन होतील तसे status , Facebook आणि telegram वर टाकतो आहेच .
Technical Hunting
लेखक: श्री. शंतनु पोतनीस
कोल्हापूर
स्टॉक मार्केट च्या update तुमच्या WhatsApp वर हवे असतील तर सोबतचा फॉर्म भरावा
form link 👉 https://forms.gle/9dz8dgTe7WB6RGqq7
Telegram link : https://t.me/technicalhuntingstockmarket