Followers

Followers

Sunday 28 January 2018

Fountainhead

"ब्लॉग" लिहायचा विचार बरेच दिवस मनात घोळत होता .
त्याच कारण असं शेयर मार्केट चा अभ्यास तर चालूच आहे. अधून मधून फेसबुक वर पोस्ट टाकत असतो, पण ऑफिशिअल ठिकाण नव्हतं जिथं सगळ्यांना कधीही वाचता येइल. ब्लॉग लिहायच्या commitment ने मार्केट चा आणि technical analysis चा जास्ती अभ्यास होईल. आणि लोकांनासुद्धा फायदा होईल .अजूनही स्टॉक मार्केट सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं नाही, त्याकडे आजून जुगार म्हणूनच बघितला जातं पण तसं नाही एवढच आत्ता सांगतो.
                  संस्कृत मध्ये म्हण आहे "अति सर्वत्र वर्जयेत" .
   

     स्टॉक मार्केट मध्ये रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत अथांग समुद्रा प्रमाणे याचा आवाका आहे. माणसाचं  आयुष्य देवाण-घेवाण (business) या सूत्रावर चालत आणि हे सूत्र अतिशय basic आहे,याला टाळून आपण जिवंत नाही राहू शकत. तर अश्या या व्यापाराच्या विषयातील थोडासा पण महत्वाचा भाग म्हणजे शेयर मार्केट जो अथांग आहे पण समजून घेतला आणि समजावून सांगितलं तर अतिशय सोपा आणि श्रीमन्तीचा दरवाजा उघडणारा.
    मला आठवतं तसं २००१ ला world trade center वर अतिरेकी हल्ला झाला होता तेंव्हापासून स्टॉक मार्केट मी बघतोय साधारण १६-१७ वर्ष झाली , शाळेतून नुकताच घरी आलो होतो TV वर बातम्या चालू होत्या अमेरिकेवर वर हल्ला world trade center वर विमान धडकावल्याचे video आणि news . बाबांची चर्चा चालू होती उद्या मार्केट पडणार ...
    त्याआधीही घरी चर्चा व्हायची साधारण १९९८-९९ असेल रेडिओ वर संध्याकाळी ६ वाजता बातम्या लागायच्या बाबां आणि त्यांचे मित्र त्या बातम्या ऐकत मार्केट बद्दल चर्चा करायचे पण खरी curiosity २००१ पासून सुरु झाली त्याला तसं कारण पण होतच याच वर्षी केतन पारेख यांचं scam उघडकीस आलं. त्याच्या कहाण्या तर अश्या कि दुपारचं जेवण करण्यासाठी केतन त्यांच्या office मधून हेलिकॉप्टर ने घरी जायचे (लहान मनात खूप काही विचार यायचे ..... हा हाः ) माझ्या लहान मनाला खूप प्रश्न पडायचे, सुदैवाने त्याची उत्तर घरातूनच मिळायची. 
     इकॉनॉमिक टाइम्स मध्ये रोज शेयर चे पानच्या पान भरून भाव यायचे त्यावेळी आता सारख एव्हडं फास्ट online trading सगळीकडे  नव्हतं ब्रोकरच्या ऑफिस मध्ये जाऊन बसावं लागत असे.  त्या बद्दल deep  माहिती पुढील काही लेखात आपण घेणारच आहोत.  
     असो , याचं  कालखंडात ब्रोकेरज म्हणजे काय ? सर्किट लागणे म्हणजे काय ? अशी खूप खूप  माहिती मिळायची शाळेच्या शिक्षणात सुद्धा फार मन लागत नव्हतं . गणितात जास्ती मार्क नाही मिळाले पण percentage काढणं आणि व्यावहारिक गणित आपोआप फास्ट होत गेलं . ज्या गोष्टीची भूक असते ती गोष्ट माणूस पटकन शिकतो ...
                रोज पेपर (न्युज पेपर ) वाचणं , माहिती घेणं आपोआप होत होतं आणि मी माहिती मिळवत गेलो !
      २०१० मध्ये technical analysis असा प्रकार असतो असं समजलं, ठाण्याच्या  श्री. अभिजीत जोशी (सर) यांनी कोल्हापुरात २ दिवसाचे workshop घेतल होत. त्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या बाकी नंतर सेल्फ स्टडी, जो अजूनही चालूच आहे.
     ब्लॉग लिहायचा उद्देश हाच कि हे सगळे अनुभव share व्हावेत, यात आपण technical analysis basic to  advance शिकणार आहोत जे सोप्या आणि मराठी भाषेमध्ये लिहणार आहे overall market बद्दल तसेच काही trade सुद्धा लिखाण करायचा विचार आहे.  ज्याने earning सुद्धा होईल आणि लिहायचं म्हंटलं कि माझाही अभ्यास जोरात होईल commitment केली असेल तर trade आजून परफेक्ट काढले जातील स्वार्थ आणि परमार्थ आहेच !
      तर ब्लॉग लिहायची संकल्पना आवडली असेल तर जरूर कळवा आणि ब्लॉग आवडला असेल तर share सुद्धा करायाला विसरू नका  जेवढे जास्ती लोक वाचतील तेव्हडा जास्ती हुरूप येईल, आणि माझ्याकडून जोरदार काम होईल .

*टीप : तुमच्या suggestion चे स्वागत आहे,