Followers

Followers

Sunday 9 January 2022

निफ्टी अंदाज दि . १०/०१/२०२२ ते दि . १४/०१/२०२२


 निफ्टी अंदाज दि . १०/०१/२०२२ ते दि . १४/०१/२०२२


गेल्या आठवड्यात निफ्टी साठी जो अंदाज बांधला होता तो ५०% चुकला असं म्हणावं लागेल मूळ trend  negative  असल्याने विचार मंदीचा होता आणि short  term  trend  हा positive  असल्याने संधी मिळाल्याशिवाय short  चा  विचार नव्हता तर शॉर्ट ची संधी काही मिळाली नाही आणि nifty  ने bounce  दाखवला 

असो, येणाऱ्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया . 


१: nifty चा chart daily candle चा ठेवावा. 


२: short term trend हा positive दिसून येतो. 


३: सध्याचा nifty  बद्दल विचार हा positive  आणि range bound  राहील असा आहे 


४: हि range  साधारण १७५०० ते १८२०० पर्यंत असेल . 


५: प्राथमिक विचार हा positive  असल्याने निफ्टी जर १७८०० ते १७९०० या दरम्यान open  झाली आणि जास्त मोठी movement  न करता १७९०० break  करू लागली तर एक positive  trade  मिळेल जो निफ्टी ला १८१०० ते १८२०० पर्यंत घेऊन जाऊ शकतो . 


६: जर ठरल्याप्रमाणे nifty  चाल दाखवू  लागली तर १७९०० चा CE  चा विचार करणे गरजेचे . 


७: stock  specific  विचार केला तर Dr . reddy  मध्ये एक फायद्याची संधी आहे . 


८: बाकी stock  जसे ओपन होतील तसे status ,  facebook  आणि  telegram  वर टाकतो आहेच .


Technical Hunting

लेखक: श्री. शंतनु पोतनीस

कोल्हापूर


Telegram  link : https://t.me/technicalhuntingstockmarket


स्टॉक मार्केट बद्दल चे अश्या प्रकारचे लेख तुम्हाला पर्सनल whatsapp वर हवे असतील तर


 whatsapp लिंक :https://bit.ly/2YgBbTe

निफ्टी अंदाज दि. ०३/०१/२०२१ ते दि. ०७/०१/२०२१


निफ्टी अंदाज दि. ०३/०१/२०२१ ते दि. ०७/०१/२०२१

         २०२२  सालामधील हा पहिलाच लेख त्यापूर्वी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . सर्वांच्या नवीन  वर्षाच्या मनोकामना तसेच संकल्प  पूर्णत्वास जावोत अशी  महालक्ष्मी चरणी प्रार्थना ...... 

          गेल्या आठवड्यात निफ्टी साठी जो अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला होता त्याला १००% यश मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही प्राथमिक अंदाज हा negative  जरी असला तरी आठवड्याचे closing  positive  होईल असा अंदाज होता तो पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे असो , येणाऱ्या आठवड्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया . 


१: निफ्टी चा चार्ट daily  candle  चा  ठेवावा . 


२: निफ्टी चा मूळ ट्रेण्ड  negative  आहे आणि शॉर्टटर्म ट्रेण्ड  positive  असल्याचे दिसून येत आहे . 


३: nifty  चे structure  बघता एक bounce  नंतर थोडी range  आणि पुन्हा negative  असा दिसून येत आहे . 


४: गेल्या आठवड्यात अपेक्षा केल्याप्रमाणे चाल दाखवली आहे . त्यामुळे तेच analysis continue  केलं तर पुन्हा एक  पडझड अपेक्षित आहे . 


५: येणाऱ्या events  चा विचार करता म्हणजे oct -nov -dec  या  quarter  चे result  तसेच येणाऱ्या budget  चा विचार करता nifty  ची चाल range  bound  असेल . 


६: option  मार्केट चा  विचार करता १७३५० आणि १७१५० या दोन्ही PUT  option  कडे लक्ष हवे येणाऱ्या ६ तारखेच्या expiry  साठी या मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे . 


७: stock  specific  बोलायचं झाल्यास nestle  या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट च्या हिशोबाने विचार करणे गरजेचे सध्याचा भाव १९७०५ चालू आहे . TH च्या विद्यार्थ्यांना या मध्ये बिनधास्त entry  करावी असे गेल्या आठवड्यात सुचवले आहे .